सरस्वती गणेश मंडळ, अंबाजोगाई हे शहरातील एक प्रतिष्ठित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून, धार्मिक परंपरा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. भक्ती, सेवा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. सर्वधर्म समभाव विचार राखणारा व गणेशोत्सवच नव्हे तर संपूर्ण वर्षभर समाजसेवा करणारा मंडळ आहे.
आमची ओळख
स्थापना : १९५८
ठिकाण : 📍 गुरुवार पेठ, अंबाजोगाई, जि. बीड
स्वयंसेवक व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यरत
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
इतिहास
सरस्वती गणेश मंडळाची परंपरा सुमारे ६८ वर्षांची असून, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवासात या मंडळाचे महत्त्वाचे स्थान आहे. सन १९६६ मध्ये या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात "राजकमल गणेश मंडळ" या नावाने झाली. व "राजकमल मेला" नावाने ओळख पडली. ज्याने अनेक वर्षे नागरिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले.
पुढे सन १९७७ मध्ये या मंडळाचे रूपांतर सरस्वती गणेश मंडळ या नावाने झाले. तेव्हापासून हे मंडळ गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. परंपरा, समाजसेवा आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा वारसा जपत सरस्वती गणेश मंडळ आजही समाजाशी घट्ट नाते जोडून कार्यरत आहे.
श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा-अर्चा, आरती, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, गरजूंना मदत, स्वच्छता अभियान आणि विविध समाजोपयोगी उपक्रम.
सरस्वती गणेश मंडळ, आंबाजोगाई येथे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्याचा आणि परस्पर सन्मानाचा उत्सव आहे. मंडळाकडून सर्व धर्मांच्या सण-उत्सवांचा आदर राखला जातो. विविध धर्मांच्या मिरवणुकांना पिण्याच्या पाण्याची सेवा, समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सर्व समाजघटकांचा सहभाग आणि परस्पर सहकार्याची परंपरा हीच आमच्या मंडळाची ओळख आहे. "एकता, सेवा आणि बंधुभाव" ही आमची कायमची मूल्ये आहेत.
भक्ती – श्री गणेशावरील अढळ श्रद्धा
सेवा – समाजासाठी निस्वार्थ कार्य
एकता – सर्वांना सोबत घेऊन उत्सव साजरा करणे
पारदर्शकता – आर्थिक व्यवहार व कामकाजात स्पष्टता
संस्कार – नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख