फराळ वाटप उपक्रम | २०२५
“सणाचा आनंद वाटला, तरच तो खऱ्या अर्थाने पूर्ण होतो!”
सन २०२५ मध्ये आमच्या गणेश मंडळातर्फे गरजू व्यक्ती तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी फराळ वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. “आपल्या ताटातील थोडासा आनंद दुसऱ्याच्या आयुष्यात मोठे हास्य आणू शकतो,” या विचारातून राबविलेला हा उपक्रम मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावाचे प्रतीक ठरला.
“गणरायाचा उत्सव फक्त आपल्या आनंदासाठी नव्हे,
तर समाजातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी!”
बक्षिसाच्या रकमेतून पूरग्रस्तांना मदत| २०२५
मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे मंडळाने लोकांना किराणा किट आणि मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.
महिला सक्षमीकरण आणि वृद्धांना सामाजिक आधार|२०२५
गावातील गरजू वृद्ध व्यक्तींना दैनंदिन जीवनात मदत व्हावी म्हणून आधार काठी आणि चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
हरित-उत्सव|२०२५
यंदाचा गणेशोत्सव आम्ही पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करत आहोत. मंडळाच्या वतीने परिसरात वृक्षारोपण करून निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने हे निसर्गाचे रूप आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करो, हीच प्रार्थना.
रक्तदान|२०२५
आमच्या गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तुमच्या रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकतो, याच भावनेतून अनेक नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.