फिरती माणुसकीची भिंत – २०२४

                                                     “नको असेल ते देऊन जा, हवे असेल ते घेऊन जा”                                                                                 या सुंदर विचारातून आमच्या गणेश मंडळाने २०२४ साली ‘फिरती माणुसकीची भिंत’ हा अनोखा सामाजिक उपक्रम राबविला.या उपक्रमासाठी एका टेम्पोला आकर्षक पद्धतीने सजवून त्यावर ‘माणुसकीची भिंत’ असा संदेश देण्यात आला. हा टेम्पो संपूर्ण अंबाजोगाई शहरात फिरवून नागरिकांना आपल्या घरातील वापरात नसलेल्या, मात्र इतरांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले.संकलित झालेल्या वस्तूंची योग्य प्रकारे छाननी करून त्या गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या उपक्रमाला अंबाजोगाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

                             “तुमच्यासाठी नको असलेली वस्तू, कोणाच्यातरी आयुष्यात गरजेची ठरू शकते…

                                            म्हणून नको असेल ते देऊन जा आणि हवे असेल ते घेऊन जा!”

या उपक्रमातून आमच्या गणेश मंडळाने ‘गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे’ हा संदेश कृतीतून दिला.