Add Headings and they will appear in your table of contents.
गणेशोत्सव 2025
प्रस्तावना : सरस्वती गणेश मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव २०२५ भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळविण्यात आला.
“उत्सव काही दिवसांचा, समाजसेवा वर्षभराची!” या विचाराने मंडळाची वाटचाल सुरू असून, या अहवालात गणेशोत्सव २०२५ मधील प्रमुख उपक्रम व कार्याची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. सर्व देणगीदार, कार्यकर्ते, स्वयंसेवक व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. 🙏
२. गणेशोत्सव २०२५ मधील प्रमुख उपक्रम
गणेशोत्सव २०२५ – प्रमुख उपक्रम
सरस्वती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, अंबाजोगाईच्या वतीने गणेशोत्सव २०२५ मध्ये भक्ती, सामाजिक बांधिलकी, आरोग्य, पर्यावरण व जनजागृती यांचा समन्वय साधणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.
श्री गणेश मूर्ती स्थापना व ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा शुभारंभ.
रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर – CBC, LFT, KFT आदी तपासण्या.
वृद्धाश्रमात अन्नदान व गरजूंसाठी मदत.
महिलांना रोजगारासाठी साखळी शिलाई मशीन वाटप उपक्रम.
भटक्या श्वान व जनावरांच्या सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर बेल्ट वाटप.
CREDAI अंबाजोगाई यांच्या सहकार्याने बांधकाम कामगारांना सेफ्टी कॅप व रिफ्लेक्टर जॅकेट वाटप.
गरजू कुटुंबांना धान्य वाटप.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ग्लोव्हज व हेअर कॅप देऊन स्वच्छतेबाबत जनजागृती.
वृक्षारोपण व स्वच्छता अभियान, तसेच योग-प्राणायाम व मुद्गल प्रशिक्षण.
गरजू वृद्धांसाठी चष्मे व आधारकार्ड सुविधा.
महिलांसाठी होम मिनिस्टर मनोरंजन कार्यक्रम.
लाईनमन, वॉटरमन व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान.
अंबाजोगाईच्या रेल्वेच्या मागणीसाठी ‘अंबाजोगाई जंक्शन’ हा भव्य देखावा व सेल्फी पॉइंट.
भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व प्रथमोपचार सुविधा.
शेवटी डीजेविरहित पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात पर्यावरणपूरक विसर्जन करून विसर्जित मातीपासून वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला.
“उत्सव काही दिवसांचा, समाजसेवा वर्षभराची!”
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
कार्यकारिणी :
ADHYAKSHअध्यक्ष : KULDEEP KISHORLUAMR PARDESHI
karyadhyaksh akshay pardeshi
UPADHYKSH SANJAY APUR A
SACHIV NIKESH MUTHA
KOSHADHYAKSH YOGESH PARDESHI
SANSKRUTIK ADHYSKH ; ashiwn pardeshi nihal pardeshi
miravnukh pramukh : SAMEER LATA
SAMAJIK UPAKRAM ADHYSKH ; rohit modi
dekhava samiti santosh pardeshi mahesh p ashish alok modi
prasiddhi pramukh shekhar joshi, akssh modi
आर्थिकlekhajokhaवर्ष :